प्रसंग – अर्थातच एक मसाज सेशन

मसाज प्रकार – नॉन एरोटिक न्यूड स्वीडिश प्रोटोकॉल
क्लाएंट – एकोणतीस वर्षांची महिला


प्राथमिक एफ्लुराज झाल्यावर शरीराच्या एकेका भागावर मध्यम दाब देत मसाज सुरू होता. हात, पाय, पाठ, पोट झाल्यावर मी मोर्चा तिच्या स्तनांवर नेला. नॉन-एरोटिक मसाज असल्याने मला तेथे रेंगळण्याचे काही कारण नव्हते. स्तनाग्र संवेदनशिल असल्याने त्यांना स्पर्श करण्याचे टाळत स्तनावर साधा हात फिरवत होतो. पण हे करत असताना, मला वाटते दोन किंवा तीन वेळा स्तनाग्रांना स्पर्श झालाच. चौथ्या वेळी हात लागला आणि त्या महिलेने अंग आखडून घेतले, पाय घट्ट दाबून घेतले आणि काही कळायच्या आत तिची कामपूर्ती झाली!
आम्हा दोघांनाही awkward झाले! तसा मी नवखा होतो त्यामुळे केवळ स्तनाला, त्यांच्या अग्रांना स्पर्श ओझरता स्पर्श केल्याने orgasm येतो, याचे आश्चर्य वाटले. कसाबसा आम्ही दोघानी तो प्रसंग निभावला. पुढे अजून दोन चार वेळा इतर क्लाएंट सोबत असे घडले. त्यातील एक क्लाएंट पुरुष होता.


हे घडाभर तेल (pun intended) वापरून केलेले नमन ज्याच्यासाठी आहे तो विषय म्हणजे स्तनाग्र कामपूर्ती अर्थात nipple orgasm….
पौगंडावस्थेत पहिली कामपूर्ती, orgasm, (स्त्री-पुरुष दोघांनाही बहुदा हस्तमैथुनातून) झाली की, त्याची चटक लागते. त्यात काहीच गैर नाही. तहान, भूक याप्रमाणे ती शरीराची एक गरजच! पुढे वयात आल्यावर रीतसर कामक्रीडा सुरु झाली की, संभोगातून कामपूर्ती व्ह्यायला लागते, पुरुषांची तर निश्चितच.
काम पूर्ती म्हणजे नेमके काय, या प्रश्नाची अनेक उत्तरे देता येतील. काही तज्ज्ञांच्या मते लैंगिक कामोत्तेजनेचा परमोच्च बिंदू म्हणजे कामपूर्ती. त्यावेळी शरीरात अनेक बदल घडतात. शरीरातला सर्व ताण दूर होतो, आणि स्नायू लयबद्धपणे आकुंचन पावतात. या बरोबरच मेंदूमध्ये काही आनंद देणारी संप्रेरके (हॉर्मोन्स) सुद्धा तयार होतात आणि शरीराच्या ताणाबरोबर मनावरचा ताण देखील नाहीसा होतो.


आयुष्यातली पहिली कामपूर्ती जननांगाला (पुरुषात लिंग, स्त्री मध्ये योनी) स्पर्श करून मिळत असल्याने, कामपूर्ती आणि जनानांगाचा घनिष्ट संबंध आहे. परंतु शरीरावरील अनेक संवेदनशिल जागांना स्पर्श करून देखील कामपूर्ती होऊ शकते, त्यांना erogenous zones म्हणतात (या विषयी एक पोस्ट मी पूर्वी लिहिली होती). त्यातील एक महत्त्वाचा भाग आहे स्तनाग्र, निपल. स्तनाग्र हे बऱ्याच लोकांसाठी, स्त्री पुरुष दोघांमध्ये, संवेदनशिल असते. त्याला स्पर्श करून, चुंबन घेऊन कधी बोटाने किंवा दाताने चावून, खेळून काम पूर्ती होण्या इतकी उत्तेजना वाढू शकते. यालाच स्तनाग्र कामपूर्ती (Nipple Orgasm) म्हणतात. जननांगांना स्पर्श न करताही कामपूर्ती होणे शक्य असते, असा माझा अनुभव आहे.
स्तनाग्रे म्हंटली की स्त्रीचे शरीर डोळ्यांसमोर येते हे साहजिकच आहे. स्त्रियांमध्ये स्तन दुहेरी काम करते, हे सर्वश्रुत आहेच. २०१६ मधील एका अभ्यासानुसार जवळपास १२% महिलांना केवळ स्तनाग्रांच्या उद्दीपनाणे कामपूर्ती होते. पण पुरुष देखील याचा आनंद घेऊ शकतात, ही बाब तशी कमी लोकांना माहिती असावी.
पण कसा असतो निपल ऑरगॅझम ?

हेही वाचा   सेक्सबाबतच्या या ७ गोष्टी माहिती आहेत? ज्या कोणीही कधीही तुमच्याशी नाही केल्या शेअर


मुळात कामपूर्ती/ऑरगॅझम क्लिष्ट कल्पना आहे. परंतु सर्वसाधारणपणे यात तीन टप्पे दिसून येतात. मज्जातंतू उत्तेजित होणे, लयबद्ध लैंगिक क्रिया आणि भावनिक संबंध


पहिला टप्पा एकूण तृप्ती साठी महत्त्वाचा असतो. विशिष्ट प्रकारे मज्जातंतू उद्दिपित होणे गरजेचे असते. म्हणूनच शरीरस्पर्श ही पहिली पायरी असते. शरीराच्या सर्व भागांप्रमाणे स्तनाग्रांमध्ये मज्जातंतूचे (nerves) जाळे असते, याचा उल्लेख मी माझ्या पूर्वीच्या एका लेखात केलाच होता. त्या जाळ्यामुळे स्तनाग्रे विलक्षण संवेदनशिल असतात. एकवेळ हाताला झालेला स्पर्श लक्षात येणार नाही, पण स्तनग्राला ओझरता स्पर्श झाला की लगेच कळते. संवेदना तर इतकी तीव्र असते की, गुन्हे कबूल करून घेताना स्तनाग्राला चिमटे लावणे, वीजेचे धक्के देणे असले भयानक उपाय केले जातात. ज्यांनी स्तनाग्र टोचली आहेत, त्यात रिंग वगैरे घातली आहे, त्यांना याची कल्पना असेलच. असो.


जरा विषयांतर झाले, पण मुद्दा हा आहे की, अती संवेदनशील स्तनाग्र कामोत्तेजना वाढवण्यापासून ते कामपूर्तीपर्यंत उपयोगी पडतात. अर्थात प्रत्येक व्यक्तीचे शरीर वेगळे असते त्यामुळे एखादी व्यक्ती केवळ स्तनाग्र उद्दिपणाने तृप्त होते की नाही, हे इतर अनेक गोष्टींवर अवलंबून असते. जरी कामपूर्ती सर्वसाधारणपणे सारखीच असली, तरी कशी होते यात अनेक मतांतरे आहेत. स्तनाग्र-कामपूर्ती, जननांग-कामपूर्ती सारखी असू शकते किंवा आंतरिक असू शकते. काही लोकांमध्ये स्तनाग्रे उद्दिपित केली की प्रथम धीम्या गतीने उत्तेजना वाढत जाते, आणि अचानक सर्वंगातून तृप्तीची संवेदना पसरते. स्त्री पुरुष दोघांनाही याचा अनुभव येतो. स्त्रियांमध्ये स्तनाग्रे मोठी आणि जास्त विकसित असल्याने याचे प्रमाण जास्त असते.
नेमके कोण हा अनुभव घेऊ शकतो?

तात्त्विकदृष्टया कोणालाही स्तनाग्र उद्दिपनाने काम पूर्ती होऊ शकते. काही लोकांमध्ये स्तनाग्र अधिक संवेदनशील असू शकतात आणि केवळ स्तनाग्र उत्तेजनाद्वारे तृप्ती मिळवणे सोपे असू शकते. इतरांसाठी, थोडीफार ट्रायल एरर करून स्तनाग्र उद्दिपित करण्याची रीत सापडू शकते. स्वतः किंवा जोडीदारासोबत प्रयोग करत, उद्दिपनाच्या वेगवेगळ्या पद्धती (स्पर्श करणे, ओढणे, चुंबन घेणे, चावणे इ.) वापरून, किंवा काही उपकरणे वापरून नेमकी उत्तेजना कोणत्या प्रकारे वाढते, हे समजते.
आनंद मिळवायचा कसा?


प्रत्येक शरीर वेगळे असते, त्यामुळे सर्वाँना उपयोगी पडेल अशी एक पद्धत सांगता येणार नाही. परंतु स्वतः ची पद्धत ठरवण्यासाठी खाली काही प्रकार करून पहावेत.
घाई गडबड करू नका
सुरुवातीला स्तनाग्र कामतृप्तीसाठी बराच वेळ लागू शकतो. त्यामुळे भरपूर वेळ देऊन, प्रत्येक संवेदनेचा अनुभव घ्या. त्यातली जी जास्त आनंद दायक असते, त्यावर लक्ष केंद्रित करा.
मानसिक उत्तेजना

हेही वाचा   Sex and Pleasure: सेक्स आणि लैंगिक सुखाचा परमोच्च क्षण म्हणजे काय?


शरीरात उत्तेजना जागृत होण्यासाठी प्रथम मन त्या प्रकारच्या स्थितीत असणे महत्वाचे आहे. मन शांत असणे महत्त्वाचे. फोरप्ले, मंद प्रकाशयोजना, संगीत यांचा मन कामुक भावनेत नेण्यासाठी उत्तम उपयोग होतो. लैंगिक उत्तेजनाची कल्पना करण्याने मन उत्तेजीत होण्यास मदत होते, असे काही प्रयोगात दिसून आले आहे.
संवाद साधा
इतर कोणत्याही लैंगिक कृतीप्रमाणे, संवाद ही महत्त्वाची गोष्ट आहे. आपल्याला काय आवडते (चिमटे काढणे, चावणे किंवा काही उपकरणे वापरणे). जोडीदाराला विश्वासात घेऊन त्याच्या/तिच्या स्तनाग्रांविषयी आवडी निवडी जाणून घेतल्या तर दोघेही एकमेकांना आनंद देऊ शकता. त्यामुळे संवाद साधणे, हा एक महत्वाचा भाग आहे.
शरीराच्या अनेक भागांना उत्तेजित करा


स्तनाग्रांना उत्तेजित करताना, जननेंद्रियांसह इतर इरोजेनस झोनला स्पर्श करण्याचा प्रयत्न करा. अनेक क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केल्याने एखाद्या व्यक्तीला उत्तेजीत होण्यास मदत होऊ शकते. अर्थातच स्तनाग्र केंद्रस्थानी ठेवावे.
उपकरणांचा आणि इतर पद्धतींचा वापर
अनेक कामुक उपकरणे किंवा उत्तेजना पद्धती वापरून लैंगिक अनुभव मिळवता येतो.
उदाहरणार्थ, काही मसाज आणि बॉडी-ऑइल संवेदनशीलता वाढवू शकतात. स्तनाग्रांवर तेल चोळल्याने उत्तेजना वाढू लागते. सुवासिक तेल, जेल, साय, आईस्क्रिम इतकेच नव्हे तर अगदी लाळसुद्धा वापरली, तरी त्याचा उत्तम परिणाम दिसतो.


तुम्ही स्तनाग्रांना हाताने उत्तेजित करू शकता, छातीला मालिश करून, नंतर अंगठा आणि तर्जनी यांच्यामध्ये स्तनाग्र फिरवून, कधी दाबून तर कधी ओढून. व्हायब्रेटर/मसाजर वेगळ्या प्रकारचा आनंद देतात.
थंड-गरम हा खेळ तर माझा स्वतःला आवडणाऱ्या प्रकारांपैकी. स्तनाग्रांवर बर्फाचे तुकडे चोळणे आणि नंतर गरम पाण्यात भिजवलेल्या कापडाने स्पर्श करणे, यात होणाऱ्या तापमान बदलाने मज्जातंतू वेगाने उद्दिपित होतात. अधिक धाडसी लोक स्तनाग्रांना चिमटे लावणे, टोकदार वस्तूंनी टोचणे हे ही प्रकार करतात (मी फारसा त्यात जात नाही!)
या शिवाय तुम्ही स्वतः कल्पना शक्ती वापरून नवीन प्रयोग करून नक्कीच करून बघू शकता.


साधारण एक दोन वेळा वेगवेगळ्या पद्धती वापरल्या की, कोणत्या मार्गाने पुढे जाऊन स्वतःला आणि जोडीदाराला हमखास कामुक आनंद मिळण्याची आपली पद्धत मिळते!
तर, मंडळी स्तनाग्र तृप्तीचा नक्की विचार करा.


माझ्या एका वाचकाला जरी याचा उपयोग झाला, तरी या पोस्टचा उद्देश सफल संपूर्ण झाला, असे मी म्हणेन!
©आदि

स्तनाग्र_कामतृप्ती

Leave a Comment

error: Content is protected !!