दरवर्षी चार सप्टेंबरला जागतिक लैंगिक आरोग्य दिन असतो. यासाठी ठिकठिकाणी कार्यक्रम राबवले जातात विशेषतः सेक्स वर्करसाठी. याचा जास्त भर हा सेक्स मधून होणारे काही आजार आणि त्याबाबतची जाणीव जागृती असा असतो पण सेक्स या विषयावर सामान्यपणे काय चर्चा केली जाते?
सामान्य स्त्री आणि सेक्स हा विषय आज आपण चर्चेला घेऊया.
शहरी भागात काही ठराविक भागामध्ये जनजागृती झालेली आहे ,पण सगळीकडे असे नाही .
माझ्याकडे याचा एक गमतीदार अनुभव आहे. आमच्या इकडच्या भागातील बहुतांश मुलं उच्च शिक्षणासाठी शहरी भागात आहेत. त्यावरून आम्हा मैत्रिणी मध्ये चर्चा निघाली आणि मी म्हणाले शहरांमध्ये मुली व्हायब्रेटर वापरतात. आता व्हायब्रेटर म्हणजे काय हे काय त्यांच्या लक्षात येईना. त्या म्हणाल्या तूच सांग काय आहे.मग मी त्यांची फिरकी घेण्यासाठी म्हणाले की ,तुम्ही तुमच्या नवऱ्यांना विचारा त्यांनी नाही सांगितलं तर मग मी सांगते. तीन-चार दिवस गेले पण त्यांचं त्यांच्या नवऱ्याना विचारायचं धाडस काही झालं नाही. हे सेक्सशी संबंधीत काहीतरी आहे हे त्यांच्या लक्षात आलं
. मग मी त्यांना सुचवलं की तुम्ही youtube वर बघा तिथे तुम्हाला समजेल. पण युट्युब वर बघायचं पण त्यांचं धाडस झालं नाही. आपण बघायला जाऊ आणि आपल्याला बघताना जर कोणी बघितलं तर काय होईल या भीतीने त्यांनी ते पण पाहिलं नाही. आता इथं गंमत अशी आहे की तुम्ही ज्यांच्या सोबत पंधरा-वीस वर्ष संसार करतात त्यांच्यासोबत सेक्सवर उघडपणे बोलू शकत नाहीत म्हणजे काय?
सेक्स ही आजही बहुतांश जोडप्यांसाठी अंधारात उरकण्याची क्रिया आहे .
कदाचित प्राचीन काळात असं नसावं. त्या काळात मानव प्रत्येक गोष्ट जाणून घ्यायला उत्सुक असावा आणि जी गोष्ट त्याला लाभ देणारी आहे सुख देणारी आहे तिला तो दैवताच्या रूपात बघत असावा. त्यामुळे आज आपण दैवताच्या रूपात ज्या महादेवाच्या पिंडीचा अभिषेक करतो त्याचा वरचा भाग म्हणजे लिंग आणि खालचा भाग म्हणजे योनी आहे .योनी आणि लिंग यांच्या मिलनातून प्रजनन होते म्हणून ते पूजनीय मानले गेले.
आपण खजुराहोच्या लेण्या बघतो त्या प्राचीन काळातील आहेत .तिथल्याच का बरं कियेक ठिकाणच्या लेण्यावर लैंगिक क्रिया करणाऱ्या जोडप्यांच्या मुर्त्या कोरलेल्या आहेत. त्यावरून एक लक्षात येते की जुन्या काळात अतिशय निखळपणे या क्रियाकडे बघितले गेलं असावं. असे आढळून येतं की त्याकाळी कामशास्त्र शिकवलं जायचं.
आपल्याकडे प्राचीन काळातील #वात्सायन ऋषींचा #कामसूत्र हा ग्रंथ प्रसिद्ध आहे. यामध्ये स्त्री-पुरुष प्रणय यांचं अतिशय सुंदर वर्णन आहे. खरंतर लग्नाआधी अशा प्रकारचे पुस्तक वाचलं गेलं पाहिजे. लोकं स्टॅन्ड वर मिळणारे जे पुस्तक घेतात ते पुस्तक फक्त वाचनास चालवणारी असणार असतात त्याच योग्य माहिती नसते.
सेक्स ही क्रिया प्रजनना पुरती मर्यादित नाही . तर ती एक आनंददायी क्रिया आहे. जशी अन्नाची भूक आहे तसेच मैथुन हे देखील एक नैसर्गिक गरज आहे. पण जसं पुरुषांसाठी ही गरज मान्य झाली तसं स्त्रियांना ही गरज आहे हे उघडपणे स्त्री मान्य करत नाही आणि पुरुष तिची गरज न लक्षात घेता सेक्स करतो.
सेक्स हा स्त्री साठी पण असतो हेच अजून आपण स्विकारत नाही त्यामुळे कित्येक स्त्रियांना ऑर्गेजम काय असतो तो कसा मिळतो हेच माहिती नाही.
आपल्या शरीराच्या नेमक्या कोणत्या भागाला स्पर्श झाला म्हणजे आपण उत्तेजित होतो हे स्वतः स्त्रीला पण माहिती नसतं मग ती जोडीदाराला काय सांगणार.
अजूनही सेक्स ही क्रिया पुरुषांना नवऱ्यांना खुश करण्यासाठी प्रजननासाठी आहे हीच ती समजते. त्यामुळे ती सेक्स मधला एक निष्क्रिय व घटक होऊन जाते. त्या प्रक्रियेमध्ये सामील होत नाही.
लैंगिक गरजेची पूर्तता हा तिचा अधिकार आहे. ज्या स्त्रिया हा अधिकार मागतात त्या चरित्रहीन, वाह्यात ,उथळ वागणाऱ्या ठरवल्या जातात.
पण यात खरच स्त्रीचा दोष आहे का? मुलं तरी अधून मधून कसलीशी पुस्तक वाचतील, एकमेकांमध्ये चर्चा करतील .पण मुलींना तीही संधी नसते तिच्यासाठी सेक्सी गोष्ट अतिशय घाणेरडी आणि अश्लील असते. त्यावर बोलणे म्हणजे मुलगी वाया गेलेली आहे, वाईट चालीची आहे असं ठरवलं जातं. या विषयावर तिच्याशी कोणी बोलतच नसतं. ना तिची आई , ना तिची कोणी नातलग या विषयावर चर्चा करते ना तिला स्वतःचा अनुभव सांगते .तिला माहिती तरी कुठून मिळणार ?
मग तिला ही माहिती डायरेक्ट लग्न झाल्यावर मिळते. बर तिच्या नवऱ्याला तरी ही माहिती शास्त्रीय रूपात माहिती असते का नाही कुठली तरी पिवळी पुस्तक वाचून त्याने ही माहिती मिळवलेली असते किंवा मित्रांच्या चर्चेतून ज्यांना की त्याच्यासारखेच अर्धवट माहिती असते. पण तू बायकोशी चर्चा करेलच असं नाही आणि बायकोने तर त्याला स्वतःहून सांगायचा प्रश्नच नाही त्यामुळे स्त्रीची अतृप्ती कायम राहते. अशी अतृप्त स्त्री चिडचिड होते आपली का चिडचिड होते हे पण तिच्या लक्षात येत नाही
कित्येक जोडप्यांचे अगदी किरकोळ गोष्टीवरून खटकत असतं. जेव्हा याच्या मुळाशी जातो आपण तेव्हा लैंगिक अतृप्ती हे मुख्य कारण असतं. पण त्यातून कित्येक जोडपी मार्ग काढू शकत नाहीत .कारण जी वरवरची चिडचिड ,ताणतणाव, भांडणं दिसतात ते त्यावरच लक्ष केंद्रित करतात मुळाशी जात नाहीत.
जरी लक्षात आले तरी त्यावर चर्चा कशी करायची हे त्यांच्या लक्षात येत नाही आणि चर्चाच न केली गेल्यामुळे या विषयाला पूर्णतः अश्लील समजलं गेल्यामुळे चर्चेतून मार्ग काढणे ही क्रिया घडतच नाही.
स्त्रीचा लैंगिकतेचा प्रवास हा मनाकडून शरीराकडे असतो त्यामुळे स्त्रीचं सेक्स मध्ये सहभागी होणं हे तिच्या मानसिकतेवर अवलंबून असतात. त्यामुळे पहिल्यांदा तिचं मन उत्तेजित करणे गरजेचे असते. हे काम सेक्स पेक्षा रोमांस मधून जास्त होतं. हा रोमान्स ,प्रणय जर तुम्ही अनुभवला तर संपूर्ण सेक्सचा आनंद तुम्हाला घेता येतो .
सेक्स बद्दल अनेक गैरसमज असल्यामुळे पुरुष हे मान्यच करायला तयार नसतो की आपण सेक्स करण्यामध्ये अपूर्ण आहोत. त्याला ते कबुल करणे त्याची कमतरता वाटते. हे जर मनाशी कबूल केले तर त्याची माहिती तो घेईल ,जोडीदाराला देईल .
आपण जास्त वेळ सेक्स करतो म्हणजे आपण खूप भारी सेक्स करतो असं त्याला वाटतं. त्याचवेळी स्त्रियांचा असा गैरसमज असतो की आपण जोडीदाराला आनंद देण्यासाठी सेक्स करतो .आपल्यासाठी पण ती एक आनंददायी प्रक्रिया आहे हे तिने स्वतःशी पण कबूल केलेलं नसतं आणि तिला माहित पण नसतं. हे तिला तेव्हाच माहीत होईल जेव्हा ती क्रिया तिच्यासाठी आनंददायी होईल .
त्यामुळे लैंगिक आरोग्या सोबतच लैंगिक सुखाची चर्चा जोडीदारांमध्ये झाली पाहिजे तरुण मुला-मुलींना याबाबत माहिती दिली गेली पाहिजे तुम्हाला शक्य नसेल तर त्यासाठी सेक्सोलॉजिस्ट आहेत .वाचण्यासाठी #विठ्ठलप्रभूंचं #निरामयकामजीवन हे पुस्तक आहे.